बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी युगेंद्र पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती कुस्तीगीर संघाच्या 
अध्यक्षपदी युगेंद्र पवार
बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी युगेंद्र पवार

बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी युगेंद्र पवार

sakal_logo
By

बारामती, ता. २५ ः येथील बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी युगेंद्र पवार यांची तर उपाध्यक्षपदी उत्कर्ष काळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सदस्य पदाच्या निवडी झाल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद राज्यभर देदीप्यमान कामगिरी करत आहे. यापुढेही कुस्ती क्षेत्रात भरीव काम करून राज्य व देशपातळीवर चमकतील असे मल्ल घडविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले.
सर्व सहकारी कुस्ती क्षेत्रात बारामती तालुक्याचा नावलौकिक वाढेल यासाठी सदैव प्रयत्नशील राहतील, कुस्तीगीर संघामध्ये काम करण्यासाठी सर्व स्तरातील पहिलवानांना संधी दिल्याबद्दल अध्यक्ष युगेंद्र पवार यांचे पहिलवान मंडळींनी आभार मानले. निवड करताना कुस्ती संघांचे सर्व आजी माजी पदाधिकारी ज्येष्ठ सदस्य पहिलवान उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10516 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top