
नवीन व्हेरिएंटबाबत काळजी घ्या ः पवार
बारामती, ता. २९ ः पुण्यात सापडलेल्या नवीन व्हेरिएंटबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा करून पुढील उपाययोजना ठरवली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बारामतीत दिली.
माध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले, पुण्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट बीए4 व बीए 5 या दोन्हींचे मिळून सात रुग्ण आढळले आहेत. हे विषाणू अधिक संसर्गजन्य असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या पूर्वी तमिळनाडू व तेलंगणात अशा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले होते, आता पुण्यात सात जणांना याचा संसर्ग झाल्याने आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत सोमवारी (ता. ३०) राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून उपाययोजना ठरवून माहिती दिली जाईल.
दुसरीकडे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खतांसह बी बियाण्यांची टंचाई भासू नये या साठी कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या असून मुख्यमंत्र्यांनी या बाबतची बैठक घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
नवाब मलिक यांचा राष्ट्रवादीला विसर पडला आहे असे आरोप होत असल्याच्या विचारल्यानंतर आम्हाला कोणाचाही विसर पडलेला नाही, आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत, असे अजित पवार म्हणाले.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10528 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..