पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी बारामतीत प्रशासनाकडून आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी 
बारामतीत प्रशासनाकडून आढावा
पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी बारामतीत प्रशासनाकडून आढावा

पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी बारामतीत प्रशासनाकडून आढावा

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : ‘‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका महाराज यांच्या पालख्या बारामती तालुक्यातून मार्गस्थ होतात. कोविडच्या संकटामुळे दोन वर्षानंतर पालखी सोहळा होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक येण्याचा अंदाज आहे. यंदाचा पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,’’ अशा सूचना तहसीलदार विजय पाटील यांनी दिल्या.
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका पोलिस निरीक्षक महेश ढवाण, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे उपस्थित होते.
तहसीलदार पाटील म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, वीज, रस्ते, आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह बारामती तालुक्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. भाविकांची अडचण होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. पिण्याच्या पाण्याची तपासणी करावी, सोहळ्याच्या नियोजनाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक तहसील कार्यालयात असावेत, सर्व यंत्रणांनी पालखी सोहळ्याचे व्यवस्थित नियोजन करावे.’’
या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या तयारीची माहिती दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10541 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top