बारामतीत ‘कही खुशी कही गम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत ‘कही खुशी कही गम’
बारामतीत ‘कही खुशी कही गम’

बारामतीत ‘कही खुशी कही गम’

sakal_logo
By

बारामती, ता. १३ : येथील नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले. आगामी पाच वर्षात नगरपालिकेत महिला सदस्यांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असेल. या सोडतीनंतर आता अनेकांनी प्रभाग निश्चित करून नगरसेवकपदासाठी फिल्डींग लावण्यास प्रारंभ केला आहे. या आरक्षणानंतर ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण तयार झाले आहे.
आज जाहीर झालेल्या ४१ जागांपैकी तब्बल २१ जागांवर महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे पुरुषांना २० जागा मिळणार आहेत. शासनाने धोरण बदलले असल्यामुळे नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मताला अधिक किंमत प्राप्त होणार आहे. एक ते १९ या प्रभागात दोन नगरसेवक; तर शेवटच्या विसाव्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून येतील. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक इच्छुक या आरक्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. आज जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये २० प्रभागातील ४१ जागांसाठी आरक्षण घोषित करण्यात आले.

प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग २- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ३- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ४- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ५- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ६- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ७- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ८- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ९- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १०- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ११- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १२- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग १३- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग १४- अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला
प्रभाग १५- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १६- अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला
प्रभाग १७- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १८- अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला
प्रभाग १९- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग २०- अनुसूचित जाती, दोन सर्वसाधारण महिला

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10578 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top