योगासन, वक्तृत्व स्पर्धेत बारामतीकरांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगासन, वक्तृत्व स्पर्धेत बारामतीकरांचे यश
योगासन, वक्तृत्व स्पर्धेत बारामतीकरांचे यश

योगासन, वक्तृत्व स्पर्धेत बारामतीकरांचे यश

sakal_logo
By

बारामती, ता. १३ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे विभागीय स्तरावर योगासन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते.
यात बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशनच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या योग अभ्यासकेंद्रातील श्रेया जगदाळेने योगासन स्पर्धेत तर रिबेका मणेकरने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला.
जागतिक योग दिनानिमित्त नाशिकमध्ये अंतिम फेरी होणार असून यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. योगासनांमध्ये स्थिरता, करण्याची पद्धत, कालावधी, ऐच्छिक योगासनांची निवड याचे परीक्षण करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये ‘योग एक काळाची गरज’ हा विषय देण्यात आला होता. स्पर्धेच्या तयारीसाठी डॉ. नीलेश महाजन, डॉ. भक्ती महाजन यांनी मार्गदर्शन केले. पुणे विभागात योगासन स्पर्धेत शोभा काळे, पुरुष गटात अनिल महाडीक, विकास मोहिते यांनी तर वक्तृत्वमध्ये शिवानी त्रिमले यांनी यश संपादन केले. विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान शाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10582 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top