निराधार अनुदान योजनेची बारामतीत १५२ प्रकरणे मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधार अनुदान योजनेची 
बारामतीत १५२ प्रकरणे मंजूर
निराधार अनुदान योजनेची बारामतीत १५२ प्रकरणे मंजूर

निराधार अनुदान योजनेची बारामतीत १५२ प्रकरणे मंजूर

sakal_logo
By

बारामती, ता. २० : संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी नुकत्याच झालेल्या १५२ प्रकरणांना मंजुरी दिली गेली.
बारामती येथील प्रशासकीय भवन येथे समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात ‍निवासी नायब तहसीलदार विलास करे व महादेव भोसले, समितीचे सदस्य सुनील बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, नीलेश मदने, प्रवीण गालिंदे, लालासाहेब होळकर, अशोक इंगुले, जीवना मोरे, नुसरत इनामदार आदी उपस्थित होते.
या बैठकीत एकूण १६८ अर्जाची छाननी करण्यात आली. त्यामध्ये संजय गांधी योजनेच्या ११६ प्राप्त अर्जापैकी १०९ मंजूर, तर ७ अर्ज नामंजूर केले. श्रावणबाळ योजनेच्या ४६ प्राप्त अर्जापैकी ३७ अर्ज मंजूर, तर ९ अर्ज नामंजूर केले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्त ६ अर्ज मंजूर केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10603 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top