
‘ई सर्च’ संकेतस्थळ बंद असल्याने गैरसोय
बारामती, ता. २१ : नोंदणी व मुद्रांक विभागाचे ई सर्च हे संकेतस्थळ गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे.
एखादी जमीन खरेदी करायची असेल; तर सदर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेतला जातो. बँकांकडून खरेदीसाठी अर्थसाहाय्य घेतले जात असेल; तर अशा प्रकरणात बँकांकडून सदर क्षेत्राचा सर्च करून घेण्याचे बंधन असते. सर्वांचीही सर्च करून घ्यायची तयारीही असते, मात्र नोंदणी व मुद्रांक विभागाचे ई सर्च हे संकेतस्थळ गेल्या दोन महिन्यांपासून कामच करत नसल्याने सर्वांनाच कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हे काम वकीलवर्गाकडून मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वकिलांना पक्षकारांच्या रोषाला विनाकारण सामोरे जावे लागत आहे. याबाबत पुण्याच्या जिल्हा मुद्रांक अधिकारी कार्यालयाशीही काही वकीलांनी वारंवार संपर्क साधला, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले गेले.
सदर संकेतस्थळ लवकर सुरु होणे आवश्यक आहे. ते बंद असल्यामुळे वकील पक्षकार यांची मोठी गैरसोय होत आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही पाठपुरावा केला जाणार आहे.
- ॲड. स्नेहा भापकर, उपाध्यक्षा, वकील संघटना, बारामती
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10614 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..