बारामतीत प्रारूप मतदारयादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत प्रारूप मतदारयादी जाहीर
बारामतीत प्रारूप मतदारयादी जाहीर

बारामतीत प्रारूप मतदारयादी जाहीर

sakal_logo
By

बारामती, ता. २५ : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी नगरपालिकेने प्रसिद्ध केली असून, त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.

या मतदारयादीवर सूचना व हरकती लेखी स्वरूपात १ जुलै २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत नगरपालिकेच्या कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे. या मुदतीनंतर येणाऱ्या सूचना व हरकती विचारात घेतल्या जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रारूप मतदारयादीमधील लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, संबंधित प्रभागाच्या क्षेत्रातील विधानसभा मतदारयादीमध्ये नावे चुकून वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे आदी सुधारणा या माध्यमातून करता येतील.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बारामती नगरपालिकेने प्रभाग १ ते २० या प्रभागांच्या प्रारूप मतदारयाद्या तयार केल्या आहेत. या मतदारयाद्या नगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय बारामती नगरपालिकेच्या संकेतस्थळावरदेखील या याद्या उपलब्ध असून, त्या नागरिकांना डाउनलोडदेखील करता येतील. ज्यांना या मतदारयादीसंदर्भात काही सूचना किंवा हरकती असतील त्यांनी त्या वेळेत सादर कराव्यात असे आवाहन रोकडे यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10633 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top