
पालखी सोहळ्यात मास्क अनिवार्य
बारामती, ता. २५ : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यात सोमवारी (ता. २७) तर बारामती शहरात मंगळवारी (ता. २८) आगमन होत आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने सर्वांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.
बारामती प्रशासनाने कोविड रुग्णांची संख्या वाढू नये या दृष्टीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. थंडी तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्यांची कोविडची तपासणीही करावी. बारामतीत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय व रुई ग्रामीण रुग्णालया येथे स्वॅब तपासणी सुरू आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर रॅपिड अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध आहे. कोविड लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा, तसेच ६० वर्षांहून अधिक लोकांनी तिसरा बूस्टर डोस घ्यावा, विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या काही जणांना थंडी, ताप, खोकला असे प्रकार सुरु झाले आहेत. सर्वांनीच मास्क वापरण्यासह कोविडची काळजी घ्यायला हवी, लक्षणे दिसत असतील तर तातडीने तपासणी करून घ्यावी.
- डॉ. सचिन घोरपडे,
लाईफ लाईन हॉस्पिटल, बारामती.
मिलिंद संगई, बारामती.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10634 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..