विठ्ठलनामाने दुमदुमली बारामतीनगरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठलनामाने दुमदुमली बारामतीनगरी
विठ्ठलनामाने दुमदुमली बारामतीनगरी

विठ्ठलनामाने दुमदुमली बारामतीनगरी

sakal_logo
By

बारामती, ता. २८ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती नगरीत मंगळवारी (ता. २८) उत्साहात स्वागत करण्यात आले. विठ्ठलाच्या नामघोषाने आज अवघी बारामतीनगरी विठ्ठलमय झाली होती.
नगरपालिकेच्या वतीने चौकात सजावट करण्यात आली होती, वारक-यांच्या शिल्पाला देखील फुलांची सजावट करण्यात आली होती. शारदा प्रांगणात भव्य शामियाना उभारण्यात आला असून पालखीचा मुक्काम त्यातच असेल.
शहराच्या वेशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वागत केले.

शहरातील असंख्य मंडळे, संस्था व व्यक्तिगत पातळीवरही लोकांनी वारक-यांना अन्नदान, चहा फळांसह बिस्किटे व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. अनेक महिला व पुरुष उंडवडीपासून बारामतीपर्यंत पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

प्रशासनातर्फे चोख व्यवस्था
वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. देहू ते पंढरपूर मार्गावर पुण्यानंतर सर्वात मोठे शहर म्हणून बारामतीची ख्याती आहे. वारकऱ्यांना सर्व सुखसुविधा देण्याचा प्रशासनासोबतच स्थानिक नागरिकही प्रयत्न करतात. अनेक दिंड्यांचा मुक्काम आज विविध ठिकाणी ठरल्याप्रमाणे होता.
शारदा प्रांगणात पालखी विसावल्यानंतर समाजआरती झाली, रात्री भजन व कीर्तन देखील होणार आहे. दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी पाटस रस्त्यापासून ते शारदा प्रांगणापर्यंत मोठी गर्दी उसळली होती.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10651 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..