धोकादायक झाडे उतरविण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक झाडे 
उतरविण्याची मागणी
धोकादायक झाडे उतरविण्याची मागणी

धोकादायक झाडे उतरविण्याची मागणी

sakal_logo
By

बारामती, ता. १ : पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे शहरात झाडे व फांद्या पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शहरातील खूप वर्षांपूर्वीच्या झाडांचे सर्वेक्षण करून धोकादायक झाडे व फांद्या उतरविण्याची मागणी नगरपालिकेकडे नागरिक करीत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीत जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तर, काही झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. त्यामुळे जीवितहानी होण्यास वाहनांचेही नुकसान होण्याची भीती आहे.
बारामतीमध्ये मोठ्या उंचीची झाडे आहेत. अनेक झाडे रस्त्यांच्या कडेला असल्याने वाहनांवर झाड पडण्याची भीती सर्वाधिक आहे. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यांना प्राधान्य देत अशा ठिकाणच्या झाडांचे सर्वेक्षण करून धोकादायक झाडे उतरवून घेणे गरजेचे आहे, असे बारामतीमधील नागरिकांचे मत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10658 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..