माजी सैनिकांकडून पालखी सोहळ्यास सुरक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी सैनिकांकडून पालखी सोहळ्यास सुरक्षा
माजी सैनिकांकडून पालखी सोहळ्यास सुरक्षा

माजी सैनिकांकडून पालखी सोहळ्यास सुरक्षा

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : येथील जय जवान माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पोलिसांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून मदत केली. नागवडे वस्ती ते शारदा प्रांगणापर्यंत त्यांनी पालखी सोहळ्यास सुरक्षा पुरविली. या मध्ये ३९ माजी सैनिक व १९ माजी सैनिक महिला बचत गट सदस्यांनी यात सहभाग नोंदविला.
पालखी भोवती दोन्ही बाजूने सुरक्षा कवच प्रदान करत ग्रामस्थांना पालखीचे दर्शन माजी सैनिक व माजी सैनिक महिला बचत गट अध्यक्षा वैशाली मोरे, राणी मोरे, राजश्री माळी, नीलीमा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सदस्यांनी पोलिस बांधवांना सहकार्य केले.
दुसरीकडे शारदा प्रांगण ते लिमटेक येथपर्यंत माजी सैनिकांनी पालखी सोहळ्यात सेवा बजावली. पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक पोलिस प्रशासन व माजी सैनिक यांनी भक्तीमय योगदान दिले. गणेश इंगळे यांनी माजी सैनिकांच्या या योगदानाबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

05343

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10666 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top