विद्या प्रतिष्ठानने राबविली निर्मल वारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्या प्रतिष्ठानने राबविली निर्मल वारी
विद्या प्रतिष्ठानने राबविली निर्मल वारी

विद्या प्रतिष्ठानने राबविली निर्मल वारी

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने निर्मल वारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयातील ५० मुले व १६६ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
पालखी सोहळ्यात मुलांकडे रात्री साडेआठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत उघड्यावर शौच न करू देण्याबाबत जनजागृती व सफाई अभियान राबवण्याची जबाबदारी दिली गेली होती. तसेच पहाटे सहा वाजल्यापासून हे जवळपास सकाळी ११ वाजेपर्यंत विद्यार्थिनींनी संपूर्ण बारामती शहरातील परिसर स्वच्छ करून चकाचक केला.

बारामती नगर परिषदेसमोर, शारदा प्रांगण, मेन रोड, कचेरी रोड, खंडोबा नगर, टीसी कॉलेज रोड, आमराई रोड, बस स्टॅन्ड, भाजी मंडई, मुख्य बाजारपेठेतील रोड, आंबेडकर पुतळ्याजवळ, अशा अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या कामी बारामती नगरपरिषदेच्या कर्मचा-यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश कोळपकर, डॉ. राहुल तोडमल, मंगल माळशिकारे, मेघना देशपांडे, गजानन जोशी, डॉ. जगदीश सांगवीकर, सविता निकाळे, कल्पना चंद्रमोरे, निलीमादेवी, कुदळे डॉ पाटील डॉ. जयश्री चिमणपुरे, डॉ. वेदपाठक, डॉ आनंदा गांगुर्डे व इतर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसमवेत विविध ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी प्रोत्साहित केले, अशी माहिती प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली.
05345

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10667 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top