छतावरील सौरवीज प्रकल्पास ४० टक्के अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छतावरील सौरवीज प्रकल्पास ४० टक्के अनुदान
छतावरील सौरवीज प्रकल्पास ४० टक्के अनुदान

छतावरील सौरवीज प्रकल्पास ४० टक्के अनुदान

sakal_logo
By

बारामती, ता. ८ ः विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाने घराच्या छतावरील सौर वीज प्रकल्पाला ४० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले आहे. योजनेला चालना देण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली असून, कमीत कमी कालावधीत सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महावितरणने प्रत्येक मंडल, विभाग व उपविभाग पातळीवर एक नोडल अभियंत्याची नेमणूक सुद्धा केली आहे.

बारामती परिमंडलात एकूण ५२ एजन्सी नोंदणीकृत आहेत. त्यातूनच एकाची निवड ग्राहकाला करावी लागणार आहे. या एजन्सी प्रतिनिधींची बैठक मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी नुकतीच बारामतीत घेतली.

केंद्राच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे छतावरील सौर प्रकल्प योजनेचा दुसरा टप्पा राज्यात सुरु आहे. योजनेंतर्गत घरगुती ग्राहकांना एक ते तीन किलावॅट क्षमतेसाठी ४० टक्के तर तीन किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या प्रकल्पाला २० टक्के इतके अनुदान दिले जाणार आहे. घरगुतीमध्ये गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संस्थांनाही यात समाविष्टच केले आहे. अनुदानासाठी शासनाने अंदाजे रक्कम निश्चित केली असून, प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी किंवा जास्त खर्च येऊ शकतो. यामध्ये इमारतीची उंची, बसविले जाणारे मीटर व अर्थिंगसाठी लागणारे केबल इत्यादी खर्चामुळे बदल संभवतो. अर्ज करताना लघुदाब ग्राहकांसाठी ५०० तर उच्चदाब घरगुती ग्राहकांसाठी ५००० रुपये इतके प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.

नेमका खर्च किती

एक किलोवॅट करिता येणारा खर्च पाहता शासनाने निश्चित केलेल्या ४६८२० रुपये किमतीच्या ४० टक्के म्हणजेच १८७२८ इतके अनुदान प्राप्त होईल. अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे २८०९२ रुपये खर्च येऊ शकतो. प्रकल्पाची क्षमता जेवढी अधिक तेवढा प्रतिकिलो वॅटमागे येणारा खर्च कमी होतो. उदा. एखाद्या गृहनिर्माण संस्थेने त्यांच्या छतावर १० किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेची सौरप्रणाली बसविली तर त्याचा प्रतिकिलो वॅटचा खर्च साधारणपणे ३७०२० रुपये इतकाच येतो.

अर्ज कोठे करावा

छतावरील सौर प्रणालीकरिता अर्ज करण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी कंपनीच्या संकेतस्थळाला किंवा https://www.mahadiscom.in/ismart/ या लिंकवर भेट द्यावी. अर्ज करताना वीजग्राहक क्रमांक, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करून पुढील माहिती भरावी. ज्या ग्राहकांचा मंजूर वीजभार ३ किलोवॅटपेक्षा कमी आहे. त्यांना भार वाढवून घेण्याची आवश्यकता नाही.

पाच वर्षांचा करार

सौरऊर्जा प्रकल्पाची देखभालीची हमी पाच वर्षांची राहील. तसा करार संबंधित एजन्सी व ग्राहक यांच्यात होईल. कराराचा मजकूर ऑनलाइन उपलब्ध आहे. सर्व कागदपत्रे डाऊनलोड करून, व्यवस्थित भरून अपलोड करणे गरजेचे आहे. प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महावितरणचे नोडल अभियंता व एजन्सी मदत करतील.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10682 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top