विरोधाला विरोध करणार नाही ः अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरोधाला विरोध करणार नाही ः  अजित पवार
विरोधाला विरोध करणार नाही ः अजित पवार

विरोधाला विरोध करणार नाही ः अजित पवार

sakal_logo
By

बारामती, ता. ९ ः राज्यातील सत्तांतरानंतर आता विरोधी पक्ष नेतृत्वाची भूमिका पार पाडायची असली तरी केवळ विरोधाला विरोध कधीच करणार नाही, मात्र अन्याय करणाऱ्या बाबी ठामपणे सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या जातील, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. निधी वाटपाच्या बाबतीत झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण दिले. वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या योजनांचा दाखला त्यांनी दिला. निर्णय घेण्याचा अधिकार असणारांनी आपल्या भागाला थोडेसे झुकते माप दिले तर त्यात काही चुकीचे नाही. लोक दोन्हीकडून बोलतात. संधी मिळूनही जर मतदारसंघासाठी काही केले नाही तर तिकडूनही बोलले जाते आणि मतदारसंघासाठी काही केले तर त्यावरही टीका केली जाते, त्यामुळे या टीकेला आपण फारसं महत्त्व देत नाही, असे पवार म्हणाले.

राज्यामध्ये सत्तांतराचे नाट्य घडत असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता आणि सर्व आमदारांनी हा निर्णय शेवटपर्यंत पाळला, असे अजित पवार म्हणाले. भाजप- सेना युतीचे सरकार होते तेव्हा ठाण्यामध्ये झालेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनीच वैतागून राजीनामा देऊ केला होता, याची आठवण करून देत अजित पवार म्हणाले की, त्या काळात शिवसेनेचे लोक राजीनामे खिशात घेऊन फिरायचे. त्या काळात शिवसेनेच्या फक्त १२ आमदारांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यावेळेस असलेल्या लोकांबरोबरच आताचे मुख्यमंत्री गेलेले आहेत, आता ते नेमके कसे काम करतात ते आपण सर्वजण बघूया, असे पवार म्हणाले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10689 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top