चतुरचंद महाविद्यालयामध्ये शनिवारी मेगा भरती मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चतुरचंद महाविद्यालयामध्ये शनिवारी मेगा भरती मेळावा
चतुरचंद महाविद्यालयामध्ये शनिवारी मेगा भरती मेळावा

चतुरचंद महाविद्यालयामध्ये शनिवारी मेगा भरती मेळावा

sakal_logo
By

बारामती, ता. १२ : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये देशातील नामांकित बँकांच्या नोकरी भरतीचा मेगा मेळावा होणार आहे. येत्या शनिवारी (ता. १६) सकाळी १० ते दुपारी ४ महाविद्यालयातील जीवराज सभागृहामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. एचडीएफसी, एल. ॲण्ड टी. आणि एकझुबरंट प्रा. लि. या बँकात तीनशे जागांकरिता ही मेगा भरती करणार आहेत.
ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून या भरतीमध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. कोरोना काळानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणत थेट नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनी या भरतीत सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या w.w.w.tccollege.org या संकेत स्थळावर मिळेल. तसेच या संकेत स्थळावर जाऊन गुगल फॉर्म भरून विद्यार्थांना भरती प्रक्रीयेकरिता नोंदणी करायची आहे, अशी माहिती महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलचे समन्वयक कृष्णा काळे यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10697 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..