‘अनेकान्त’मध्ये बाल शिक्षण डिप्लोमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अनेकान्त’मध्ये बाल शिक्षण डिप्लोमा
‘अनेकान्त’मध्ये बाल शिक्षण डिप्लोमा

‘अनेकान्त’मध्ये बाल शिक्षण डिप्लोमा

sakal_logo
By

बारामती, ता. १९ ः येथील अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच बाल शिक्षण डिप्लोमा प्रशिक्षणाचे उद्‍घाटन करण्यात आले.
शाळा कमिटीचे संचालक स्वरूप शहा (वाघोलीकर), सम्राट शहा (वाघोलीकर), सोनिक शहा (पंदारकर) यांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले.
या प्रसंगी स्कूलच्या प्राचार्या राखी माथूर, समन्वयिका स्मिता ढवळीकर उपस्थित होत्या. बाल शिक्षणातील डिप्लोमा हा लहान मुलांच्या विकासास म्हणजेच 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना कौशल्य आणि योग्यतेचे सखोल व व्यावहारिक ज्ञान प्रदान करतो.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांन्वये 3 ते 6 हा वयोगट शालेय अभ्यासांतर्गत आलेला आहे. बालकाच्या मानसिक जडणघडणीच्या विकासासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असून मुलांचे संगोपन शिक्षण, पूर्व शाळा शिक्षण, कौटुंबिक डे केअर शिक्षणामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम योग्य असून इच्छुक उमेदवारांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राचार्या राखी माथूर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10719 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..