विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचा क्षेत्रभेटीस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचा क्षेत्रभेटीस प्रतिसाद
विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचा क्षेत्रभेटीस प्रतिसाद

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचा क्षेत्रभेटीस प्रतिसाद

sakal_logo
By

बारामती, ता. २२ : विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या वतीने क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. नैसर्गिक घटक व सांस्कृतिक घटकांची माहिती जाणून घेणे व माहितीचे संकलन करणे हा क्षेत्रभेटीचा हेतू आहेत. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी सेनव्हीऑन या पवनचक्कीचे पार्ट तयार करणाऱ्या कंपनीला भेट दिली. तसेच रिअल डेअरीस भेट दिली. या ठिकाणी मुलांना दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांची माहिती देण्यात आली. तसेच बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये पेपरमीट ही कंपनी पाहिली. यामध्ये कापड कटिंग, स्टिचिंग, प्रेस ते पॅकिंगची माहिती दिली. याशिवाय एसटी डेपोचा वर्कशॉपच्या ठिकाणीही भेट देण्यात आली. मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या क्षेत्रभेटीमध्ये ८ वी ते १० वी च्या ८२० विद्यार्थ्यांनी व ३१ शिक्षकांनी सहभाग घेतला. उपमुख्याध्यापिका संगीता साठे, पर्यवेक्षक प्रकाश यादव यांनी सहकार्य केले. तर नियोजन यशवंत चांदगुडे, माधुरी देवरे यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10722 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top