
टीसी महाविद्यालयात रंगल्या ‘आठवणीतील कविता’
बारामती, ता. २३ ः येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ''आठवणीतील कविता'' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते. कवी हनुमंत चांदगुडे, सोमनाथ कदम यांनी कविता सादर केल्या.
हनुमंत चांदगुडे यांनी बारामती परिसरातील ग्रामीण कवींच्या साहित्याची माहिती दिली. सोमनाथ कदम यांनी विडंबन काव्य, शेतकरी गीत, कऱ्हा नदीबद्दल कविता, तसेच ''कांद्यानी केला वांदा'' ही कविता सादर केली.
सूत्रसंचालन डॉ. मेघा बडवे यांनी केले. तर आभार प्रा. भीमराव तोरणे यांनी मानले. या प्रसंगी रवींद्र माने, डॉ. रंजना नेमाडे, बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष तुषार कोकरे, डॉ. सीमा नाईक गोसावी आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10728 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..