बारामतीत युवकाच्या कानातील बाळी हिसकावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत युवकाच्या कानातील बाळी हिसकावली
बारामतीत युवकाच्या कानातील बाळी हिसकावली

बारामतीत युवकाच्या कानातील बाळी हिसकावली

sakal_logo
By

बारामतीत युवकाची
बाळी हिसकावली
बारामती, ता. २१ : दुचाकीवरून मित्रासह मध्यरात्री घरी जात असलेल्या युवकाला अडवत दोघांनी त्याच्या कानातील सोन्याची बाळी हिसकावली. या घटनेत युवकाच्या कानाला गंभीर दुखापत झाली. त्याच्याकडील मोबाईलही हिसकावून घेण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघा अज्ञातांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शहर पोलिस ठाण्यात याबाबत प्रदीप लहू खराडे (वय २४, रा. चौधरवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. सोमवारी (ता. १८) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हा एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतो. घटनेदिवशी तो मित्र प्रतीक मुंगळे याच्यासह वालचंदनगरला गेला होता. रात्री सव्वादोनच्या सुमारास ते दोघे बारामती बस स्थानकाजवळून जात असताना दोघांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्याच्या मित्राकडील मोबाईल जबरीने काढून घेतला. एकाने फिर्यादीला धरून ठेवले, तर दुसऱ्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी हिसकावून घेतली. त्यात डाव्या कानाला जखम होऊन रक्त आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10729 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..