बारामतीचे विद्या प्रतिष्ठान ‘सीबीएसई’मध्ये शंभर नंबरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीचे विद्या प्रतिष्ठान 
‘सीबीएसई’मध्ये शंभर नंबरी
बारामतीचे विद्या प्रतिष्ठान ‘सीबीएसई’मध्ये शंभर नंबरी

बारामतीचे विद्या प्रतिष्ठान ‘सीबीएसई’मध्ये शंभर नंबरी

sakal_logo
By

बारामती, ता. २३ ः विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलने दहावी व बारावीच्या सीबीएसई परिक्षेत शंभर टक्के यश संपादन केले. शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राहिल्याची माहिती प्राचार्या राधा कोरे यांनी दिली. बारावीत विज्ञान शाखेत पायल गावडे, सेजल पिसाळ व तेजस दराडे यांनी, वाणिज्य शाखेत संस्कृती पाटील, शुभम पवार व चिराग कोठारी यांनी तर दहावीच्या परिक्षेत सृजल सावंत, मृणाल कडू व शंतनू निंबाळकर यांनी यश संपादन केले.
विद्या प्रतिष्ठान सायरस पूनावाला स्कूलचा निकालही शंभर टक्के लागला. यजुवेंद्र प्रताप रणवरे, सोहम संजय पवार व वेदांतिका प्रताप रणवरे यांनी घवघवीत यश संपादन केले. यजुवेंद्र यास गणित व संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे प्राचार्या यशस्विनी निगडे यांनी सांगितले.
पिंपळीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर शाळेचाही शंभर टक्के निकाल जाहीर झाला. या शाळेत प्रीती उदय बर्गे, सनवर्धिनी नीलेश मगर व प्रथमेश किरण कुंभार या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याचे प्राचार्या कल्पना बारवकर यांनी सांगितले. अक्षय झगडे यास इंग्रजी, श्रेया गाडे संस्कृत, सोशल सायन्समध्ये प्रीती बर्गे, तर अक्षय झगडे, प्रीती बर्गे व सनवर्धिनी मगर यांनी आयटीमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळविले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10731 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..