पुणे ते बारामती आज आरोग्यवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे ते बारामती 
आज आरोग्यवारी
पुणे ते बारामती आज आरोग्यवारी

पुणे ते बारामती आज आरोग्यवारी

sakal_logo
By

बारामती, ता. २३ ः विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे पुणे ते बारामती रिले रन या आरोग्यवारीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २४) चार गटात ही स्पर्धा होणार असून त्यात ७५० धावपटू सहभागी होणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी दिली.
रविवारी पहाटे चार वाजता पुण्यातील सारसबागेतून या रॅलीला प्रारंभ होणार आहे. बारामतीतील शारदा प्रांगणात संध्याकाळी सहा वाजता समारोप होणार आहे. चार टप्प्यात ही रॅली होणार असल्याची माहिती आयोजन कमिटीचे सदस्य रवींद्र थोरात, समीर ढोले, नाना सातव, गौतम काकडे, रवींद्र पांडकर, अजिंक्य साळी, मच्छिंद्र आटोळे यांनी दिली.
अल्ट्रारनर व गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड खेळाडू प्रीती मस्के ही ६४ किमी रनिंग करणार आहे. हॅप्पी फिट चॅम्पियनचे संस्थापक आणि मॅरेथॉन धावपटू अमित कुमार हे १०० किमी धावणार आहेत. तसेच लोकेश पाटील, राकेश कुमार, हेमंत पाटील, सुनील आगरकर, तामली बासू'' औरंगाबादचे सचिन घोगरे, साताऱ्याचे विशाल घोरपडे सहभागी होतील.
या आरोग्यवारीच्या माध्यमातून एकूण ६३, ००० किमी सामूहिक रनिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या विक्रमाची नोंद २०२२च्या सर्वाधिक किमीचा सार्वजनिक रिले रन या अंतर्गत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10732 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..