मोटार चालकाने चोरली गॅरेजमालकाची रोकड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटार चालकाने चोरली
गॅरेजमालकाची रोकड
मोटार चालकाने चोरली गॅरेजमालकाची रोकड

मोटार चालकाने चोरली गॅरेजमालकाची रोकड

sakal_logo
By

बारामती, ता. २७ : दुरुस्तीसाठी मोटार गॅरेजमध्ये घेऊन आलेल्या चालकाने गॅरेजमालकाची ड्रॉवरमध्ये ठेवलेली २५ हजारांची रोकड चोरल्याची घटना बारामतीत घडली.
बारामती शहरातील इंदापूर रस्त्यावरील ओंकार बॅटरी व गॅरेजमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी मोटारीच्या (क्र. एमएच २५ झेड ८६८६) चालकावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गॅरेजमालक आशिष जालिंदर मुरूमकर (रा. मोतीबाग, इंदापूर रोड, बारामती) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. २३) दुपारी ही घटना घडली. घटनेदिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास संबंधित मोटार त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आली होती. या वेळी फिर्यादीचा भाऊ आकाश याने घरातून २५ हजार रुपयांची रक्कम आणून ड्रॉवरमध्ये ठेवली होती. संबंधित मोटारीचे काम झाल्यानंतर दुपारी मोटारचालकाने गॅरेजमधून मोटार नेली. त्यानंतर चोरीची घटना समोर आली. गॅरेजमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता त्यात संबंधित मोटारीच्या चालकाने मोटारदुरुस्तीचे काम सुरू असताना रक्कम काढल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याच्याविरोधात फिर्याद देण्यात आली.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10754 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..