बारामतीत राजकीय गणिते बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत राजकीय गणिते बदलणार
बारामतीत राजकीय गणिते बदलणार

बारामतीत राजकीय गणिते बदलणार

sakal_logo
By

बारामती, ता. २८ : बारामती तालुका पंचायत समितीच्या गणनिहाय आरक्षणाची गुरुवारी सोडत झाली. यंदा रचना बदललेली असल्याने पुन्हा एकदा ‘कही गम तर कही खुशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आरक्षणानंतर अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी पडलेले असून, पुन्हा नव्याने आता राजकीय गणिते बदलणार, अशी चिन्हे आहेत.
बारामती तालुक्यात यापूर्वी सहा जिल्हा परिषदेचे गट, तर बारा पंचायत समितीचे गण अस्तित्वात होते. नवीन रचनेनुसार आता सात गट व चौदा गण होणार आहेत. बारामती नगरपालिकेची हद्दवाढ व माळेगाव नगरपंचायतीची निर्मिती झाल्याने यंदा तालुक्याचे चित्र काहीसे बदललेले आहे. तालुक्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असल्याने यंदा भाजपकडून काय भूमिका घेतली जाणार, याबाबत उत्सुकता आहे.


गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
सुपे- सर्वसाधारण
शिर्सुफळ- सर्वसाधारण
काटेवाडी- सर्वसाधारण
वाघळवाडी- सर्वसाधारण
निंबूत- सर्वसाधारण
पणदरे- सर्वसाधारण महिला
मुढाळे- सर्वसाधारण महिला
मोरगाव- सर्वसाधारण महिला
डोर्लेवाडी- सर्वसाधारण महिला
काऱ्हाटी- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
नीरावागज- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
गुनवडी- अनुसूचित जाती
वडगाव निंबाळकर- अनुसूचित जाती महिला
सांगवी- नागरिकांचा मागास प्रवर्ग

BMT22B05482

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10756 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..