बारामतीत रोजगार मेळाव्यात २२१ जणांना नोकरीची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत रोजगार मेळाव्यात २२१ जणांना नोकरीची संधी
बारामतीत रोजगार मेळाव्यात २२१ जणांना नोकरीची संधी

बारामतीत रोजगार मेळाव्यात २२१ जणांना नोकरीची संधी

sakal_logo
By

बारामती, ता. ३० : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात २२१ उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त झाली.
बारामतीतील अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे नुकतेच रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये बारामती, जेजुरी, कुरकुंभ, पुणे या परिसरातील २३ उद्योजक सहभागी झाले. यावेळी ३७५ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, त्या पैकी २२१ उमेदवारांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी सहायक आयुक्त कविता जावळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. अनेकांतचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सचिव मिलिंद वाघोलीकर, एम्सचे सचिव विकास लेंगरेकर, संचालक डॉ. एस.ए. लाहोरी यांनी या मेळाव्यासाठी मार्गदर्शन केले.

उमेदवारांची उदासीनता
अनेकांत संस्थेने युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्याची तयारी केली होती. यासाठी २३ उद्योजकांनी एक हजार १९४ जागा कळविल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात मेळाव्यासाठी ३७५ उमेदवारांनीच हजेरी लावली. एकीकडे नोकरी नाही म्हणून युवक निराश होताना दिसतात. मात्र बारामतीत रोजगाराच्या चांगल्या संधी अनेकांतने निर्माण करून दिलेल्या असतानाही ९७३ जागा रिकाम्याच राहिल्या. चांगले मनुष्यबळ आवश्यक असताना व दुसरीकडे युवकांना कामाची गरज असताना प्रत्यक्षात मात्र मनुष्यबळ मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10766 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..