
बारामती नगर परिषद कामगार पतसंस्थेचा बारा टक्के लाभांश
बारामती, ता. १: ‘‘आर्थिक शिस्त पाळून व्यवस्थित चालणारी एक आदर्श पतसंस्था म्हणून बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्थेचा नावलौकीक आहे,’’ असे प्रतिपादन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
बारामती नगर परिषद कामगार पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये रोकडे बोलत होते. संचालक मंडळाने यंदा सभासदांना बारा टक्के लाभांश घोषित केला आहे. संस्थेने एप्रिल २०२२ पासून कर्जाची मर्यादा साडेसात लाख रुपयांवर नेली असून व्याजदर नऊ टक्के केला आहे. यंदाही सभासदांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप केले.
सचिव अनिल गोंजारी यांनी अहवाल वाचन केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील धुमाळ व राजेंद्र सोनवणे यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, पतसंस्थेच्या उपाध्यक्षा प्रतिभा सोनवणे, राजेंद्र सोनवणे, भालचंद्र ढमे, चंद्रकांत सोनवणे, फिरोज आत्तार, दादासाहेब जोगदंड, उमेश लालबिगे, संजय चव्हाण, विजय शितोळे, अजय लालबिगे, दीपक अहिवळे, सुवर्णा भापकर आदी यावेळी उपस्थित होते. अध्यक्ष सुनील धुमाळ यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10774 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..