टीसीच्या विद्यार्थ्यांनी बनविले सीडबॉल ''टीसी''च्या विद्यार्थ्यांनी बनविले सीडबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीसीच्या विद्यार्थ्यांनी बनविले सीडबॉल
''टीसी''च्या विद्यार्थ्यांनी बनविले सीडबॉल
टीसीच्या विद्यार्थ्यांनी बनविले सीडबॉल ''टीसी''च्या विद्यार्थ्यांनी बनविले सीडबॉल

टीसीच्या विद्यार्थ्यांनी बनविले सीडबॉल ''टीसी''च्या विद्यार्थ्यांनी बनविले सीडबॉल

sakal_logo
By

बारामती, ता. २ : येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात वनसंवर्धन समितीच्या वतीने ''सीडबॉल तयार करणे'' या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या कविवर्य मोरोपंत उद्यानामध्ये घेण्यात आली.
या कार्यशाळेत वनस्पतिशास्त्र विभागातील डॉ.माधुरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले. उपप्राचार्या वैशाली माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ९५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यशाळेत बनविलेले सीडबॉल पणदरेतील वनक्षेत्रामध्ये रोपण करण्यात आले.
स्वागत उदय कळंत्रे यांनी केले. स्नेहल ब्राम्हणकर यांनी आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांनी मार्गदर्शन केले. सीडबॉल रोपण करण्यासाठी पणदरे येथील सावित्रीबन ग्रामविकास मंचचे महादेव भिसे आणि त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले. याप्रसंगी समिती प्रमुख उदय कळंत्रे, अशोक देवकर, पांडुरंग ओवेकर, प्रा.संजय खोमणे उपस्थित होते.

05518

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10777 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top