बारामतीच्या नऊ जणांचा आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीच्या नऊ जणांचा आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग
बारामतीच्या नऊ जणांचा आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग

बारामतीच्या नऊ जणांचा आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग

sakal_logo
By

बारामती, ता. ५ : बारामतीचे तब्बल नऊ जण कझाकिस्तान येथे होणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बारामतीतून प्रथम आयर्नमॅन होण्याचा सन्मान प्राप्त केलेले सतीश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक ननवरे हे दुसऱ्यांदा तर मयूर आटोळे, डॉ. वरद देवकाते, युसुफ कायमखानी, अवधूत शिंदे, राजेंद्र ठवरे, ओम सावळे पाटील, विपुल पटेल व दिग्विजय सावंत प्रथमच आयर्नमॅन बनण्यासाठी बाजी लावणार आहेत.
कझाकिस्तान येथे १४ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा होणार आहे. बारामतीत आयर्नमॅन बनण्याची कामगिरी सतीश ननवरे यांनी केल्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेत अनेकांनी याचा सराव सुरु केला होता. आता एकाच वेळेस नऊ बारामतीकर पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी बाजी लावत आहेत. सतीश ननवरे आतापर्यंत तीनदा आयर्नमॅन झाले आहेत. या स्पर्धेत ६५ देशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. कोल्हापूर व पुण्यापाठोपाठ आता बारामतीतूनही मोठ्या संख्येने या स्पर्धेत स्पर्धक सहभागी होत आहेत.

अशी होईल स्पर्धा
स्पर्धेमध्ये सलग चार किमी पोहणे, १८० किमी सायकलींग व त्यामागे लगेचच ४२ किमी धावणे असे तीन क्रीडा प्रकार असतात. आयर्नमॅन बनण्यासाठी हे तिन्ही क्रीडा प्रकारांचे उद्दिष्ट १६ तासात पार करायचे असते. प्रचंड मेहनत व सराव आणि शारिरिक क्षमता यासाठी गरजेची ठरते.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10784 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..