नॉयलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॉयलॉन मांजामुळे
दुचाकीस्वार जखमी
नॉयलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी

नॉयलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी

sakal_logo
By

बारामती, ता. ६ : बारामती शहरात एकीकडे पोलिसांनी नॉयलॉन मांजाविरोधात धडक कारवाई करूनही अजूनही अनेक जण या मांजाचा वापर करत असून, तो जीवघेणा ठरत आहे. शुक्रवारी (ता. ५) संध्याकाळी आपले काम आटोपून घरी निघालेले नितीन काका वणवे हे आपल्या दुचाकीवरून इंदापूर रस्त्याच्या मागील बाजूने निघाले होते, मात्र काही कळायच्या आत त्यांच्या गळ्याला नॉयलॉन मांजा कापल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
या दुखापतीमुळे त्यांच्या गळ्याला जवळपास २६ टाके घालायची पाळी डॉक्टरांवर आली. नितीन वणवे यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांच्या स्वरयंत्राला इजा झाली नाही किंवा मुख्य नसांना धक्का लागला नाही. मात्र, तरीही त्यांच्या जिवावरच बेतले होते.
बारामती शहर पोलिसांनी धडक कारवाई करून नॉयलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केलेली होती, मात्र तरीही या मांजाने नितीन वणवे यांच्या जिवाशी खेळ झाला. बारामती शहरात केवळ मांजा विक्रेतेच नाही, तर या मांजाने पतंग उडविताना कोणी आढळला; तर त्याच्यावरही कारवाईचा पोलिसांनी इशारा देऊनही अजूनही नागरिकांकडून सर्रास हा मांजा वापरला जात असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

नितीन वणवे यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांच्या स्वरयंत्राला इजा झाली नाही, मात्र तरीही आतील व बाहेरील मिळून २६ टाके त्यांना टाकावे लागले. एखाद्याच्या जिवाशी आपण खेळतो आहोत, याचे भान नॉयलॉन मांजा वापरणाऱ्यांनी ठेवायला हवे.
- डॉ. संजय पुरंदरे, बारामती

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10793 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..