पक्षाचे चिन्ह काढून घेणे अयोग्य : शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
पक्षाचे चिन्ह काढून घेणे अयोग्य : पवार

पक्षाचे चिन्ह काढून घेणे अयोग्य : शरद पवार

बारामती : धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि तेव्हापासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नसल्याची भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (ता.१०) मांडली.
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना दुसरा पक्ष काढायचा असेल तर ते जरुर काढू शकतात, दुसरे चिन्हही ते घेऊ शकतात. मी देखील काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा आम्ही नवीन पक्ष स्थापन केला. घड्याळ हे चिन्ह घेतले, आम्ही वाद वाढवला नाही, पण धनुष्यबाणाबाबत काही ना काही काढून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोकच त्याला पाठिंबा देणार नाहीत.

केंद्र सरकारवर टीकास्त्र
लोकसभेचे अधिवेशन चालविण्याबाबतची आस्था केंद्र सरकारमध्ये गेल्या काही वर्षांपासून आहे, असे आम्हाला जाणवत नाही. ज्या वेळेस सरकारला संधी मिळते तेव्हा ते अधिवेशन बंद करतात. चर्चेचा मार्ग बंद करतात. लोकांना आपली मते मांडायची संधी मिळते, ती थांबवतात आणि आपल्याला हवे तस काम करतात. त्याचाच नमुना कालच लोकसभा व राज्यसभेतही पाहायला मिळाला, या शब्दात शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

''हर घर तिरंगा'' हा देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त हाती घेण्यात आलेला उपक्रम आहे. हा काही राजकीय कार्यक्रम नाही. देशाभिमानाची बाजू यात असल्याने आमची या उपक्रमाला साथ आहे.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10816 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..