निसर्गाचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य : घोरपडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गाचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य : घोरपडे
निसर्गाचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य : घोरपडे

निसर्गाचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य : घोरपडे

sakal_logo
By

बारामती, ता. ११ : ‘‘सह्याद्री हा फक्त महाराष्ट्रातील नाही, तर भूतलावरील अद्भुत ठेवा आहे. सह्याद्रीतील प्रत्येक झाडं, फूल, फळ, प्राणी नद्या नाले या जगातील सर्वोत्तम आणि विलक्षण आहे. आपण भाग्यवान आहोत की, असा ठेवा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. त्याचे जतन करणे हे फक्त शासनाचे नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,’’ असे मत पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे यांनी व्यक्त केले.
बारामती येथे ‘बारामती ट्रेकर्स क्लब’च्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात घोरपडे हे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘ट्रेकिंग करताना फक्त टाइमपास म्हणून न करता पर्यावरणाची आवड जोपासली पाहिजे. पर्यावरणातील होणारे बदल हे मानवासाठी धोकादायक आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धन करायचे असल्यास आधी त्याबद्दल आवड निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी निसर्गवाचन आणि त्याचा अभ्यास महत्त्वाचा आहे.’’
पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड म्हणाले, ‘‘स्थानिक वृक्षप्रजातीची होणारी वृक्षतोड ही धोकादायक आहे. नवीन वृक्षारोपण करताना देखील स्थानिक प्रजातीची झाडे न लावल्यामुळे स्थानिक प्राणी, पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांच्या प्रजनन प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे आपल्या जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत.’’
या कार्यक्रमात ‘बारामती ट्रेकर्स ग्रुप’चे छायाचित्रकार ऋतुराज काळकुटे व राहुल जगताप यांचा त्यांनी ट्रेकदरम्यान केलेल्या निसर्ग छायासचित्रणासााठी विशेष सन्मान केला. यावेळी अमोल काटे, सुधीर पानसरे, प्रताप पागळे आदी उपस्थित होते. पद्मकांत निकम, प्रशांत राजपुरे, प्रशांत ढवळे, विकास गायकवाड, सौरभ घाडगे व बारामती ट्रेकर्स क्लबच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. हरीश कुंभरकर, शशांक मोहिते, विपुल पाटील, नायब तहसीलदार तुषार बोरकर, बारामती ट्रेकर्स क्लबचे अध्यक्ष ॲड. सचिन वाघ, मच्छिंद्र टिंगरे आदींनी मनोगत व्यक्त केले. ॲड. योगेश वाघ यांनी प्रास्ताविक; तर ॲड. राहुल झाडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत पवार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10821 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..