पवार कृषी महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवार कृषी महाविद्यालयास 
पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता
पवार कृषी महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता

पवार कृषी महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता

sakal_logo
By

बारामती, ता. १० ः येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयास कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या आधिपत्याखालील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रम सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावर सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. अशा प्रकारची मान्यता मिळवणारे हे राज्यातील एकमेव खासगी महाविद्यालय आहे.
यामध्ये एम. एस्सी. (कृषी) अंतर्गत कृषी विद्या, मृदाशास्त्र व कृषी रसायनशास्त्र, भाजीपाला शास्त्र, फळशास्त्र, कृषी कीटक शास्त्र, वनस्पती रोग शास्त्र, कृषी विस्तार व संवाद, कृषी अर्थशास्त्र, अनुवंश व रोग पैदास शास्त्र, पशुसंवर्धन, दुग्धशास्त्र यासह एमबीए (कृषी) व कृषी व्यवसाय व्यवस्थापन या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.
सदर पदवीधर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया व शुल्क निश्चिती आणि शिक्षण विषयक कार्यप्रणाली यांचे सनियंत्रण करण्याचे अधिकार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांना राहणार आहेत.
या संदर्भात प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली असून इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी केले आहे. https://maha.agriadmissions.in या संकेतस्थळावर १३ ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे.

कृषी विषयातील नवीन संधी
या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात कृषी विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्याची संधी राज्यातील विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यामुळे हे एक नवीन दालन विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमधील अत्याधुनिक सोयी सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे, याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन राजेंद्र पवार यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10822 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..