जेजुरी येथील दांपत्यावर फसवणूकप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरी येथील दांपत्यावर
फसवणूकप्रकरणी गुन्हा
जेजुरी येथील दांपत्यावर फसवणूकप्रकरणी गुन्हा

जेजुरी येथील दांपत्यावर फसवणूकप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

बारामती, ता. १३ : बारामती शहरातील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी जेजुरी (ता. पुरंदर) येथील दाम्पत्याविरद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बारामतीचे बांधकाम व्यावसायिक मनोज लक्ष्मण पोतेकर यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून पोलिसांनी पंकज गुजर व श्रद्धा पंकज गुजर (रा. जेजुरी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जेजुरी येथील रजनी हेल्थ केअर कंपनीच्या मालक श्रद्धा गुजर यांच्याशी बांधकामाचा करार झाला होता. साडेतीन कोटींच्या या करारानुसार जीएसटीची रक्कम धरून पावणेचार कोटी रुपये येणे बाकी होते. त्यापैकी काही रक्कम संबंधितांनी जमा केली. मात्र, काही रक्कम वगळता जवळपास वीस लाखांची रक्कम गुजर यांनी दिली नव्हती. या रकमेसाठी गुजर यांनी धनादेश दिला होता, तो परत आला. जेव्हा पोतेकर यांनी पैशांसाठी फोन केला तेव्हा जेजुरीत गाडी अडवू आणि आमचा हिसका दाखवू, अशी दमदाटी त्यांना केली गेली, असे पोतेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. प्रोप्रायटर श्रद्धा गुजर असताना पंकज गुजर यांनी सही केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
मिलिंद संगई बारामती.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10840 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..