नवीन अभ्यासक्रमाबाबत प्राध्यापकांची ऑनलाइन कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन अभ्यासक्रमाबाबत प्राध्यापकांची ऑनलाइन कार्यशाळा
नवीन अभ्यासक्रमाबाबत प्राध्यापकांची ऑनलाइन कार्यशाळा

नवीन अभ्यासक्रमाबाबत प्राध्यापकांची ऑनलाइन कार्यशाळा

sakal_logo
By

बारामती, ता. १४ : विद्याप्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामार्फत ‘इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट अँड डेव्हलपमेंट’ या विषयावरील नवीन अभ्यासक्रमाची ऑनलाइन कार्यशाळा झाली.
या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, बिओएस चेअरमन डॉ. डी. एस. बोरमाने, विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर, विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचा हेतू इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विद्याशाखेमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट अँड डेव्हलपमेंट’ हा जो नवीन विषय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे याची माहिती अभियांत्रिकीच्या सर्व प्राध्यापकांना व्हावी हा होता. या नवीन अभ्यासक्रमाचे अध्यायन अध्यापन विद्यार्थ्यांना कसे करावे तसेच त्या विषयाचे विषयाचे अध्यायन अध्यापन सुलभ व्हावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब पाटील, सहाय्यक प्रेमानंद कडबे व शशांक बिरादार यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10843 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..