‘चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’चा आज १०१ जोडप्यांचा लकी ड्रॉ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’चा 
आज १०१ जोडप्यांचा लकी ड्रॉ
‘चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’चा आज १०१ जोडप्यांचा लकी ड्रॉ

‘चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’चा आज १०१ जोडप्यांचा लकी ड्रॉ

sakal_logo
By

बारामती, ता. १४ : बारामती येथील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या वतीने १०१ जोडप्यांना मोफत आयव्हीएफ उपचार केले जाणार आहेत. या १०१ जोडप्यांच्या नावाचा लकी ड़्रॉ काढण्याचा कार्यक्रम सोमवारी (ता. १५) होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील इंदापूर रस्त्यावरील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांनी दिली.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेल्या वर्षापासून डॉ. जळक दांपत्याकडून हा उपक्रम राबविला जात आहे. यंदा १०१ जोडप्यांना या उपचारासाठी तब्बल ८० लाखांचा खर्च येणार आहे. गतवर्षी ३१ जोडप्यांवर मोफत आयव्हीएफ उपचार केले. गेल्या आठ वर्षांपासून चैतन्य मातृत्व योजनेच्या माध्यमातून जवळपास चार हजार जोडप्यांवर यशस्वी उपचार करून त्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद डॉ. जळक यांनी मिळवून दिला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10847 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..