गोगादेव जन्मोत्सवाची बारामतीमध्ये लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोगादेव जन्मोत्सवाची बारामतीमध्ये लगबग
गोगादेव जन्मोत्सवाची बारामतीमध्ये लगबग

गोगादेव जन्मोत्सवाची बारामतीमध्ये लगबग

sakal_logo
By

बारामती, ता. १६ ः येथील वाल्मीकि समाजाच्या वतीने यंदा वीर गोगादेव जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गोगादेव जन्मोत्सव साजरा करता आला नव्हता, यंदा हा उत्सव साजरा होणार असल्याने भाविकांत उत्साहाचे वातावरण आहे.

येथील गोगादेव व गोरक्षनाथ मंदिर येथे जन्मोत्सव साजरा केला जातो. राज्यातून वाल्मिकी समाजाचे भाविक यात सहभागी होतात. भगवान वीर गोगादेव निशाण आखाङा यांच्या वतीने कोरोना काळात मिरवणूक रद्द करून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते कोरोना निधी सरकारकड़े जमा करण्यात आला होता. यापूर्वीदेखील सांगली पुरग्रस्त लोकांना प्रत्यक्ष सांगलीला जावून मदत केली होती

यावर्षी भगवान वीर गोगादेव यांचे पवित्र निशाणची नागपंचमीला स्थापना करण्यात आली. सध्या मंदीरात दररोज भजन सुरू असून, २१ ऑगस्ट रोजी पवित्र निशाणाची मिरवणूक निघणार असल्याची माहिती निशाण आखड्याचे अध्यक्ष ॲड. धीरज लालबिगे यांनी दिली.

निशाण आखाड्याचे ॲड. लालबीगे यांच्यासह आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे, संजय मुलतानी, विलासराव लालबिगे, किरसपाल वाल्मिकी, राजेश लोहाट, धर्मेंद्र कागड़ा, प्रदीप लालबिगे, गोपाल वाल्मिकी, मुकेश वाघेला, योगेश लालबिगे, साजन लालबिगे, भगवान लालबिगे आदी परिश्रम घेत आहेत.
----------------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10853 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..