बारामती ठरले ‘आयर्नमॅन’चे शहर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती ठरले ‘आयर्नमॅन’चे शहर!
बारामती ठरले ‘आयर्नमॅन’चे शहर!

बारामती ठरले ‘आयर्नमॅन’चे शहर!

sakal_logo
By

बारामती, ता. १६ : कझाकस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत यंदा बारामतीकरांनी आपल्या कामगिरीने ठसा उमटविला. बारामतीच्या आठ जणांनी पूर्ण आयर्नमॅन व एकाने हाफ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत नवीन इतिहास रचला.
वर्ल्ड ट्रायथोन असोसिएशन ऑफ कझाकस्तान यांच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी कझाकस्तानची राजधानी नूर सुलतान येथे ही आयर्नमॅन स्पर्धा झाली. यंदा या स्पर्धेसाठी जगातील ६५ देशांतील ३१०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. बारामतीच्या ओम सावळे पाटील, अवधूत शिंदे, विपुल पटेल, राजेंद्र ठवरे, डॉ. वरद देवकाते, युसूफ कायमखानी, अभिषेक ननवरे, मयूर आटोळे या आठ जणांनी पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा; तर दिग्विजय सावंत याने हाफ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत एक नवीन इतिहास रचला. यशस्वी खेळाडूंना पदक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह बहाल करून त्यांचा सन्मान केला गेला.
या सर्वच खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांपासून या स्पर्धेसाठी कमालीची मेहनत व तयारी केली होती. धावणे, सायकलींग व पोहण्याच्या सरावासाठी त्यांनी कष्ट केलेले होते. संपूर्ण शारीरिक क्षमतेचा कस या स्पर्धेदरम्यान लागतो. त्यामध्ये तिन्ही प्रकारात पूर्ण क्षमता लावत अवघ्या सोळा तासात हे अंतर पार करावे लागत असल्याने फिटनेस असणे गरजेचे ठरते. एकाच वेळेत तब्बल नऊ जणांनी यंदा आयर्नमॅन करत बारामतीचा नावलौकीक उंचावला.

अशी असते स्पर्धेत
शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेत १८० किलोमीटर सायकल चालविणे, ४२ किलोमीटर धावणे व ३.८ किलोमीटर पोहणे, अशा तीन प्रकारांचा समावेश असतो. सोळा तासांत ही स्पर्धा पूर्ण करणे अनिवार्य असते.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10854 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..