बारामतीकरांसाठी गुरुवारपासून सांस्कृतिक मेजवानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीकरांसाठी गुरुवारपासून सांस्कृतिक मेजवानी
बारामतीकरांसाठी गुरुवारपासून सांस्कृतिक मेजवानी

बारामतीकरांसाठी गुरुवारपासून सांस्कृतिक मेजवानी

sakal_logo
By

बारामती, ता. २८ : कोरोना काळाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर आता पुन्हा एकदा गणेशोत्सवात बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. यंदा गुरुवारी (ता. १) विरोधी पक्षनेते अजित पवार व बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती गणेश फेस्टिव्हलचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली.
दररोज संध्याकाळी सात वाजता तीन हत्ती चौकातील नटराज नाट्य कला मंदिर येथे हे कार्यक्रम होणार असून सर्वांसाठी ते विनामूल्य खुले असतील. यंदा फेस्टिव्हलमध्ये एक सप्टेंबरला भरत जाधव यांची भूमिका असलेले ''मोरूची मावशी'' हे नाटक सादर होणार आहे. मराठी हिंदी गाणी व नृत्यांचा सप्तसुरांचा इंद्रधनू कार्यक्रम दोन तारखेला तर तीन रोजी मेलडी मेकर्स हा इंटरनॅशनल ऑर्केस्ट्रा होईल. कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांचे कीर्तन चार तारखेला होणार असून पाच रोजी लता मंगशेकर यांच्या गीतांचा लतायुग हा कार्यक्रम होईल. सहा रोजी नव्वदच्या दशकातील सदाबहार हिंदी गाण्यांचा संदीप पंचवाडकर प्रस्तुत आशिकी हा कार्यक्रम होईल. मराठी लावणी नृत्याचा ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम सात तारखेला सादर होणार असून, स्थानिक कलावंतांचा क-हेचे कलावंत हा कार्यक्रम आठ तारखेला दुपारी चार वाजता तर याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता लख लख चंदेरी हा मराठी लावणी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.

अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या श्रीमंत आबा गणपती महोत्सवात एक सप्टेंबर रोजी गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या गीतांचा व अभिनेत्री नेहा खान यांच्या नृत्याचा कार्यक्रम होईल. दोन रोजी व्हॅक्यूम क्लीनर हे नाटक, तीन रोजी डान्स जल्लोष हे कार्यक्रम कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात होणार आहेत. सहा सप्टेंबर रोजी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होईल. या शिवाय वृक्षारोपण, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मोफत आरोग्य तपासणी व नेत्ररोग तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुनील लडकत यांनी दिली. सर्व कार्यक्रम विनामूल्य सर्वांसाठी खुले असतील.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10913 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..