भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर

sakal_logo
By

बारामती, ता. २९ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या ६ सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत.
आगामी बारामती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना करणे, हा त्यांच्या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे.
या दौऱ्यामध्ये त्यांच्या समवेत पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, बाळासाहेब गावडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली.
बावनकुळे हे ५ सप्टेंबर रोजी बारामती मुक्कामास येणार असून, ६ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत तब्बल १२ तास ते बारामती शहर व बारामती तालुक्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. त्यामध्ये भाजपच्या काही शाखांची उद्‍घाटन होणार असून, काही मान्यवरांच्या गाठीभेटी ते घेतील. या व्यतिरिक्त पत्रकार परिषदेस ते संबोधित करणार आहेत. बारामती शहर व बारामती तालुक्यातील काही प्रमुख मान्यवरांशी ते चर्चा करणार आहेत. बारामती तालुक्यातील काटेवाडी, माळेगाव, बारामती शहर या ठिकाणी ते भेट देणार आहेत.शहरातील भिगवण रोडवरील मुक्ताई गार्डन या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मोटे यांनी दिली.
भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले असून, त्याची रणनीती आखण्याच्या दृष्टिकोनातून भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. आगामी काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा होणार असून, त्या दृष्टीने दौऱ्याची आखणी करण्याचा प्रयत्न बावनकुळे करणार आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10921 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..