...तर इंग्रजी माध्यम शाळा आरटीई प्रवेश देणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर इंग्रजी माध्यम शाळा आरटीई प्रवेश देणार नाही
...तर इंग्रजी माध्यम शाळा आरटीई प्रवेश देणार नाही

...तर इंग्रजी माध्यम शाळा आरटीई प्रवेश देणार नाही

sakal_logo
By

बारामती, ता. ३१ : राज्य सरकारने आरटीई थकीत परतावा दिल्याशिवाय राज्यातील कोणतीही इंग्रजी माध्यमाची शाळा पुढील आरटीई प्रवेश देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने दिला आहे.
बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यकारिणीत हा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश सांगळे यांनी दिली. संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या वेळी राज्य अध्यक्ष नामदेव दळवी, महासचिव विनोद कुलकर्णी व राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे हजारो कोटी रुपये राज्य शासनाकडे अडकून पडले आहेत, वारंवार पाठपुरावा करूनही हे पैसे परत मिळत नाहीत, त्यामुळे या विषयी कार्यवाही न झाल्यास पुढील प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी काही ठराव करण्यात आले. यामध्ये शाळांना स्वतंत्र संरक्षण कायदा करावा, मालमत्ता कर रद्द करावा, व्यावसायीक दराने लागणारे लाइटबील रद्द करावे, रिक्त असलेल्या आरटीई च्या जागा भरण्याची परवानगी द्यावी, इरादा पत्राची अट रद्द करून दर्जावाढ स्थानिक पातळींवरच द्यावी, शासनस्तरावर प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावे, आरटीई प्रवेशीत विद्यार्थी शिष्यवृत्ती स्पर्धापरीक्षेत सहभागी करून घ्यावे, शाळा सोडण्याचा दाखला अनिवार्य करावा असे ठराव संमत करण्यात आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10924 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..