काटेवाडीत अस्तरीकरणाच्या विरोधात ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काटेवाडीत अस्तरीकरणाच्या विरोधात ठराव
काटेवाडीत अस्तरीकरणाच्या विरोधात ठराव

काटेवाडीत अस्तरीकरणाच्या विरोधात ठराव

sakal_logo
By

बारामती, ता. ३० : नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला अनेक गावातून विरोध होत असतानाच आता काटेवाडी ग्रामपंचायतीनेही अस्तरीकरणाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या मंगळवारी (ता. २९) झालेल्या ग्रामसभेमध्ये या विषयावर विरोधाचा ठराव करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विद्याधर काटे होते.
ठरावामध्ये, नवीनतंत्रज्ञानाचा वापर करून अस्तरीकरण झाल्यास गावाभोवतीच्या विहिरी, तळी बोर छोटे तलाव यांचा पाण्याचा स्त्रोत पूर्णपणे बंद होईल, त्यावर अवलंबून असणारे पशुपक्षी प्राणी यांचे जीवन विस्कळित होईल, पाणी पातळी कमी होईल, शासनाच्या पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेला देखील बाधा येईल. त्यामुळे शासनाने सदर कालव्यावरील रस्ता दुरुस्त करावा, पिचिंग करावे, परंतु अस्तरीकरणाचे काम करू नये, ते रद्द करावे, सदर अस्तरीकरणाला पूर्ण विरोध करण्यात येत आहे, हा ठराव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यास आजची ग्रामसभा मंजुरी देत असल्याचे, या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीकडून अस्तरीकरणाच्या विरोधाच्या सर्वानुमते मंजूर असे लिहिलेले असले तरी ठरावावर ग्रामसेवकाची सही आहे. मात्र, सरपंचांची सही नसल्याचे समोर आले आहे. पांडुरंग कचरे हे या ठरावाचे सूचक असून, अजित रमेश काटे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10926 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..