सुप्रिया सुळे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना कानमंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुप्रिया सुळे यांच्याकडून 
पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
सुप्रिया सुळे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

सुप्रिया सुळे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

sakal_logo
By

बारामती, ता. १ : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सोशल मिडियाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच पुण्यात संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी सोशल मीडिया हाताळताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याचा कानमंत्र पदाधिकाऱ्यांना दिला. व्यक्तिशः टीका टाळणे, महिलांवर आक्षेपार्ह पोस्ट किंवा कॉमेंट न करणे, महिलांचा आदर राखला जाणे, पक्षाची ध्येय धोरणे व उद्दिष्ट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करावे, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनील बनसोडे यांनी बारामती तालुक्यात ‘गाव तिथे सोशल मीडिया अध्यक्ष’ ही संकल्पना राबविली. प्रत्येक गावात व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले, त्याप्रमाणे इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गाव तिथे सोशल मीडिया व शहरातील प्रभाग तिथे सोशल मीडिया, अशी संकल्पना राबवावी, अशा सूचना सुळे यांनी दिल्या. सोशल मीडिया सेलला फ्रंटल संघटनेत सामावून घ्यावे, या मागणीवर लवकर निर्णय घेऊ, अशी ग्वाही सुळे यांनी दिली. जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष प्रशांत सायकर, सतीश पवार तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील सोशल मीडिया पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10929 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..