रासपने सर्व निवडणूका स्वबळावर लढवाव्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रासपने सर्व निवडणूका 
स्वबळावर लढवाव्यात
रासपने सर्व निवडणूका स्वबळावर लढवाव्यात

रासपने सर्व निवडणूका स्वबळावर लढवाव्यात

sakal_logo
By

बारामती, ता. १ : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच केली.
पक्षाच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त बारामतीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात कार्यकर्त्यांनी ही भावना बोलून दाखवली. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही; तर विधानसभेच्या सर्व २८८ जागांवरही निवडणूक लढवावी, असाही आग्रह केला. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव माउली सलगर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना महादेव जानकर यांच्यापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही दिली. तालुकाध्यक्ष ॲड. अमोल सातकर यांनी मनोगत व्यक्त केले. भविष्यात रासपला विचारात घेतल्याशिवाय कोणत्याच पक्षाला सत्ता स्थापन करता येणार नाही, असे ते म्हणाले.
या प्रसंगी रवींद्र कोठारी, बाळासाहेब कोकरे, संजय माने, वैशाली वीरकर, सुवर्णा जराड, सुनील बंडगर, किरण गोफणे, तानाजी मारकड, जोतीराम गावडे आदी उपस्थित होते. संदीप चोपडे, ॲड. अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, गिरीधर ठोंबरे, श्‍याम घाडगे, शैलेश थोरात, लखन कोळेकर, अविनाश मासाळ, काका बुरूगंले, दादा भिसे, महादेव कोकरे यांनी कार्यक्रम आयोजित केला. कुमार देवकाते यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10930 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..