बारामतीच्या काही भागात दमदार पावसाची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीच्या काही भागात 
दमदार पावसाची प्रतिक्षा
बारामतीच्या काही भागात दमदार पावसाची प्रतिक्षा

बारामतीच्या काही भागात दमदार पावसाची प्रतिक्षा

sakal_logo
By

बारामती, ता. २ ः शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी तालुक्याच्या काही भागात मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
बारामती तालुक्यात विविध भागात अतिशय व्यस्त प्रमाणात पाऊस झाला असून काही ठिकाणी पाचशेहून अधिक तर काही भागात २५० मिमी. पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
बारामती तालुक्यातील अनेक गावे कायमच जिरायती म्हणून ओळखली जातात. या भागात मुळातच पर्जन्यमान कमी आहे. मात्र काही पावसाळे सुखद गेल्याने टंचाईची तीव्रता भासली नाही. यंदाच्या पावसाळ्यातही काही भागात तुफान पाऊस तर काही भाग कोरडा असे चित्र पाहायला मिळत आहे.
काल एकीकडे बारामती तालुक्यातील गाडीखेलमध्ये तब्बल १०२ मिमी पावसाची नोंद झाली तर माळेगाव परिसरात अवघा १५ मिमी पाऊस झाला. गाडीखेलसह मुर्टी मोढवे परिसर व सायंबाची वाडी परिसरात ६५ मिमीच्या आसपास पर्जन्यवृष्टी नोंदवली गेली.
तालुक्यातील शिर्सुफळ व गाडीखेल परिसरात एकाच दिवशी अतिवृष्टी झाल्याने बाजरी, मका, ऊस या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरु केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली.
दरम्यान, बारामती तालुक्यातील काही भागात पावसाने सरासरी ओलांडली आहे. मात्र, त्याच वेळेस काही भागात अजून सरासरीइतकाही पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.
बारामती तालुक्यात अकरा महसूल मंडळात कालअखेरपर्यंत ९०१७ हेक्टर बाजरी व ४८८३ हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. दुसरीकडे कडधान्यात तूर २१५, मूग ३५०, उडीद २१६, मटकी ७१, पावटा २८, वाल २६, चवळी २८, घेवडा ७०, वाटाणा १४ हेक्टरवर लागवड झाली आहे. तेलबियांमध्ये भुईमूग ५७८, सूर्यफूल ३२३, सोयाबीन १७५४ हेक्टरवर पेरणी झाले आहे. दरम्यान, नाझरे धरणातून कऱ्हा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होत असल्याने कऱ्हा नदीच्या पाण्याची पातळीही कालपासून अचानक वाढली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10933 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..