बारामतीत सर्वांचे स्वागत करू : अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत सर्वांचे स्वागत करू : अजित पवार
बारामतीत सर्वांचे स्वागत करू : अजित पवार

बारामतीत सर्वांचे स्वागत करू : अजित पवार

sakal_logo
By

बारामती, ता. २ : महाराष्ट्रातील राजकारणात अनेक प्रकारची स्थित्यंतरे येत असली तरी राजकारणाची सौहार्दाची पातळी आजही कायम आहे, याचा प्रत्यय काल अजित पवार यांनी बारामतीत दिला.
बारामती गणेश फेस्टिव्हलचे उद्‍घाटन केल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार माध्यमांशी बोलत होते. या वेळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांना राज ठाकरे आणि मी एकमेकांचे शत्रू नाही असे सांगितले. वैचारिक मतभेद असू शकतात याचा अर्थ असा नाही की, आपण आपल्या परंपरा सोडून द्यायच्या. या वेळी त्यांनी मतभेद आहेत मात्र वैयक्तिक विरोध नाही हे स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या बद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘‘ते देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना या देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात येत आहेत म्हणून पत्रकारांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही.’’ याप्रसंगी टेंडर काढण्यासाठीच नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण होत असल्याच्या राजू शेट्टी यांच्या आरोपावर पवार म्हणाले, ‘‘बारामतीकर मला राजकीय जीवनाच्या पहिल्या दिवसापासून ओळखतात. बारामती शहरात सुरू असलेली कामे ही टेंडरसाठी सुरू नसून ती बारामतीच्या विकासासाठी आहेत’’

तुम्ही कशाला पॅनिक होता...
निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, तुम्ही कशाला पॅनिक होत. या देशात कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही बारामती सर्वांचे स्वागतच करू.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10936 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..