सोशल मिडियाच्या माध्यमातून करता येणार तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मिडियाच्या माध्यमातून करता येणार तक्रार
सोशल मिडियाच्या माध्यमातून करता येणार तक्रार

सोशल मिडियाच्या माध्यमातून करता येणार तक्रार

sakal_logo
By

बारामती, ता. ३ : नगरपालिकेने नागरिकांच्या तक्रारीचे प्रभावीपणे निवारण व्हावे या उद्देशाने आता व्हाट्सअपवर तक्रारी स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी याबाबत माहिती दिली. शहरात नागरिकांना दैनंदिन अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. विविध प्रकारच्या विषयांच्या तक्रार कोठे करावी याची माहिती नागरिकांना नसते. त्यामुळे तातडीने अडचणींचे निवारण होत नाही.
बारामती नगरपालिकेने आता हायटेक होण्याचे ठरवले आहे. नागरिकांच्या तक्रारी व्हाट्सअपवर स्वीकारून तातडीने संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या अडचणींचे निवारण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

येथे नोंदवा तक्रार...
यापुढील काळात स्वच्छता, पथदिवे बंद असणे, रस्त्यांवरील खड्डे, घंटागाडी न येणे यासह पिण्याच्या पाण्याच्या समस्या, आरोग्य विषयक समस्या नगरपालिकेने दिलेल्या ८६२३८३९९०० या व्हाट्सअप क्रमांकावर नोंदवता येणार आहेत. ही नोंद करताना आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक याची माहिती व्यवस्थित दिल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला संपर्क साधणे सुलभ होईल. असे महेश रोकडे यांनी नमूद केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10942 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..