बारामतीतील पी वन, पी टू व्यवस्था तात्पुरती स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीतील पी वन, पी टू 
व्यवस्था तात्पुरती स्थगित
बारामतीतील पी वन, पी टू व्यवस्था तात्पुरती स्थगित

बारामतीतील पी वन, पी टू व्यवस्था तात्पुरती स्थगित

sakal_logo
By

बारामती, ता. ३ ः आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता व्यापारी व ग्राहक यांची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून बारामती शहरातील पी वन पी टू पार्किंग व्यवस्था तात्पुरती स्थगित करावी, अशा सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना दिल्या.
बारामती शहरात पी वन पी टू पार्किंगमुळे व्यापाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी होती. शहरातील रस्ते अरुंद असल्यामुळे वाहने लावण्यासाठी जागाच उपलब्ध होत नव्हती व किरकोळ कामासाठी येणाऱ्या वाहन चालकांना जबरदस्त दंडाची रक्कम भरावी लागत होती. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर देखील याचा विपरीत परिणाम होऊ लागला होता. ही बाब विचारात घेऊन आज बारामती शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांची त्यांच्या सहयोग या निवासस्थानी भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. व्यापारी व पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतल्यावर तात्पुरती ही व्यवस्था स्थगित करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांच्यासह माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सुशील सोमाणी, प्रवीण आहुजा, जगदीश पंजाबी, शैलेश साळुंखे, नीलेश कोठारी, नरेंद्र मोता, सचिन भुतकर, नाना शेळके यांच्यासह अनेक व्यापारी याप्रसंगी उपस्थित होते.
सणासुदीच्या गर्दीच्या काळात व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पार्किंग लॉटमध्येच वाहने पार्क करावीत, ग्राहकांना देखील पार्किंग लॉट मध्येच वाहने लावण्याचे आवाहन करावे, जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही, अशी सूचना अजित पवार यांनी केली.
अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार आहे. व्यापाऱ्यांनी अजित पवार यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10944 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..