घंटागाडीच्या अनियमितपणामुळे बारामतीकर वैतागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घंटागाडीच्या अनियमितपणामुळे बारामतीकर वैतागले
घंटागाडीच्या अनियमितपणामुळे बारामतीकर वैतागले

घंटागाडीच्या अनियमितपणामुळे बारामतीकर वैतागले

sakal_logo
By

बारामती, ता. ४ : शहरात कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असून नगरपालिका प्रशासनाने यात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.
नगरपालिकेने कचरा उचलण्यासाठी कंत्राट देऊ केले आहे. घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेच्या घंटागाड्या दररोज येतात. मात्र त्यांच्या
नियोजनात अनियमितपणामुळे बारामतीकर वैतागले आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घेत नियोजन करण्याची मागणी होत आहे.

अनेक भागात घंटागाडी येण्याच्या वेळा निश्चित नाहीत, त्यामुळे नागरिकांना अनेकदा बाहेर जायचे असल्यास कचरा घरातच साठवून ठेवावा लागतो. घंटागाडीवरील कर्मचारी सहकार्य करत नाहीत, अनेकांची वर्तणूक उद्धटपणाची आहे.

कचरा टाकण्यासाठी प्रामुख्याने महिला येतात. नवीन घंटागाडीची उंची अधिक असल्याने हात वर करून घंटागाडीत कचरा टाकणे अनेक महिलांना शक्य होत नाही, अशा वेळेस घंटागाडी सोबत असलेल्या सहायकाने हा कचरा घंटागाडीत टाकण्यासाठी मदत करणे अपेक्षित असते, प्रत्यक्षात ही मदत होत नाही.

कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना इतकी घाई असते की ते काही मिनिटे देखील कचरा उचलण्यासाठी थांबत नाही. महिलांना घंटागाडीचा आवाज ऐकू आल्यानंतर काही मजले खाली उतरून येईपर्यंत वेळ जातो, मात्र तो पर्यंत घंटागाडी निघून गेलेली असते, त्या गाडीच्या मागे महिला धावतात, असेही चित्र अनेकदा दिसते.

घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविलेली आहे, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले केले, प्रत्यक्षात अनेकदा कोणतेही कारण न देता अचानकच घंटागाडी येतच नाही. नगरपालिकेने बिले अदा करताना घंटागाडीचे कंत्राटदाराने नेमके किती काम केले आहे, हे तपासूनच बिल देणे गरजेचे आहे.

गाडीचा घोटाळा....
घंटागाडी न येण्यामागे गाडी नादुरुस्त हे कारण सातत्याने पुढे केले जाते. पर्यायी व्यवस्था नसल्याने काही भागात तीन ते चार दिवस कचराच उचलला जात नाही, अशी स्थिती आहे. नगरपालिका प्रशासन मात्र ही बाबच मान्य करत नाही.


घटागाड्यांच्या अनियमितपणाबाबत लक्ष घालून संबंधितांना सूचना देऊ. या बाबत वाहनसंख्या अपुरी पडत आहे, काही वाहने नादुरुस्त होतात. मात्र यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
- महेश रोकडे, मुख्याधिकारी

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10945 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..