''राष्ट्रवादी''च्या विसर्जनासाठी व्यूहरचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''राष्ट्रवादी''च्या विसर्जनासाठी व्यूहरचना
''राष्ट्रवादी''च्या विसर्जनासाठी व्यूहरचना

''राष्ट्रवादी''च्या विसर्जनासाठी व्यूहरचना

sakal_logo
By

बारामती, ता. ६ : ''राष्ट्रवादी''च्या विसर्जनासाठी मिशन बारामतीचा प्रारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत शक्तीप्रदर्शन करून केला आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघ काबीज करायचाच या जिद्दीने भाजपने व्यूहरचना आखण्याचा प्रारंभ सुरू केल्याचे आज जाणवले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर भाजप नेतृत्वाने बारामतीची जबाबदारी सोपवली असून, कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच असा निर्धार पक्षनेतृत्वाने केल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. ही निवडणूक गांभीर्याने घ्यायची हा संदेश प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा स्तरावरील सर्वच नेत्यांना दिला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला या सर्वच मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करून राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रीय पातळीवर ज्येष्ठ नेते शरद पवार विरोधकांनी मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याला बारामतीवर लक्ष केंद्रित करून शह देण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
सीतारामन, बावनकुळे, राम शिंदे यांच्यासह काही जणांवर खास या मतदारसंघाची जबाबदारी सोपवून कार्यकर्त्यांना ताकद देत वातावरण निर्मितीचा प्रयत्न अठरा महिने अगोदरच भाजपने सुरू केला आहे. राष्ट्रवादीच्या विसर्जनाची प्रदेशाध्यक्षांनी बालेकिल्ला असलेल्या बारामतीतून दिलेली हाक राजकीयदृष्टया महत्त्वाची मानली जात आहे.
बारामतीच्या व्यासपीठावर भाजपच्या नेत्यांनी परिवर्तनाची हाक दिलेली असली तरी पवारांचे वर्चस्व असलेल्या या भागावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कमालीचे काम करावे लागणार हे निश्चित आहे. केवळ केंद्रात आणि राज्यात सत्ता असून चालणार नाही त्यासाठी काम करण्याची गरज आहे. अनेक लाटेमध्येही बारामती लोकसभा आणि
निवडणूक लढविताना बूथपासून लक्ष केंद्रित करण्याचा महत्त्वाचा मुद्दा बावनकुळे यांनी अधोरेखित करत तळातील कार्यकर्त्याला ताकद व सन्मान देण्याची भूमिका बोलून दाखवली. त्यांनी भाषणात फक्त कागदावरचे नियोजन नको तर इमानदारीने काम करणारे कार्यकर्ते तयार करा, असे सांगत पक्षाची भूमिकाच स्पष्ट केली. ही लढाई जिंकायची असेल तर मतदारांचे मनपरिवर्तन करून त्याचे रूपांतर मतपरिवर्तनात करण्याचा संदेश त्यांनी दिला. पाच दशकांपासून वर्चस्व असलेल्या या भागाला बालेकिल्ला म्हणण्याबाबत भाजप नेत्यांनी खिल्ली उडवली असली तरी प्रत्यक्षात ही लढाई वाटते तितकी सोपी नाही याची त्यांनाही कल्पना आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रीय राजकारणातील ताकद, अजित पवार यांची राज्यातील ताकद व सुप्रिया सुळे यांचेही लोकसभेतील वजन या सर्वांचा विचार करून भाजपने रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद द्यावी, असे प्रदेशाध्यक्षांनी सुचविलेले असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाही या बाबत सूचना करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

नरेंद्र मोदी यांचीही बारामतीत सभा
निर्मला सीतारामन यांचे आगामी दोनशे दिवसात पाच ते सहा दौरे होतील, प्रदेशाध्यक्ष स्वतः तीन महिन्यातून एकदा बारामतीला येतील, प्रभारी राम शिंदे लक्ष केंद्रित करतील व मंत्रिस्तरावर राधाकृष्ण विखेपाटलांवर बारामतीची जबाबदारी देण्याची घोषणा करत बावनकुळे यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. जिंकण्यासाठी लढायचे आहे, खुद्द नरेंद्र मोदी यांचीही सभा बारामतीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असून राष्ट्रवादीची दबावतंत्राने कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे.

लाऊड आणि क्लिअर मेसेज
बारामती जिंकायची हा लाऊड आणि क्लिअर मेसेजच चंद्रशेखर बावनकुळे देऊन गेले आहेत, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. ताकद लावून राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आगामी काळात याबाबत नेमके काय होते हे पाहणे औत्सुक्याचे
ठरेल.

भाजपच्या उमेदवारावर सर्वांचे लक्ष
विधानसभा या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी पवार कुटुंबीयांवर विश्वास दाखविला हा इतिहास नजरेआड करून चालणार नाही.
राष्ट्रवादीचा आगामी उमेदवार निश्चित आहे पण भाजपकडे अद्यापही कोणाला संधी द्यायची याचीच निश्चित नसल्याने वरिष्ठ स्तरावरून उमेदवार ठरविला जाईल, असे प्रदेशाध्यक्षही म्हणाले. चेहराच निश्चित नसेल तर फक्त पक्षाच्या जिवावर निवडणूक लढविणे व शेवटच्या क्षणी संपूर्ण मतदारसंघात पोहोचणे अशक्य होते, त्या मुळे भाजप उमेदवार निश्चित करून लढत देणार की ऐनवेळेस उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10959 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..