बारामतीत नगरपालिकेतर्फे विसर्जन कुंडाची व्यवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत नगरपालिकेतर्फे विसर्जन कुंडाची व्यवस्था
बारामतीत नगरपालिकेतर्फे विसर्जन कुंडाची व्यवस्था

बारामतीत नगरपालिकेतर्फे विसर्जन कुंडाची व्यवस्था

sakal_logo
By

बारामती, ता. ७ ः गणेश विसर्जनाच्या दृष्टीने बारामती नगरपालिकेने जय्यत तयारी केली असून यंदा कऱ्हा नदी किंवा नीरा डावा कालव्यातील विसर्जन टाळण्यासाठी नगरपालिकेकडून विसर्जन जलकुंडांची व्यवस्था केली जाणार आहे.
नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी विसर्जन जलकुंडांची निर्मिती केली असून गणेशोत्सव मंडळांसह नागरिकांनीही या कुंडातच विसर्जन करावे. या शिवाय निर्माल्य कलशही ठेवले जाणार असून या कलशात नागरिकांनी निर्माल्य टाकावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पुढील ठिकाणी विसर्जन जलकुंडांची व्यवस्था ः
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा तांदूळवाडी, चिंचकर शाळा तांदूळवाडी, शिवाजीनगर, कवी मोरोपंत शाळा, श्रीरामनगर संभाजीनगर कमान जवळ, बयाजीनगर पेट्रोलपंप, रुई क्षेत्रीय कार्यालयासमोर, अभिमन्यू कॉर्नर (बनकर वडेवाले जवळ), सुर्यनगरी मंडई शेजारी अंगणवाडी सी. टी. इन चौक, जळोची क्षेत्रीय कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळावरची देवी मंदिरालगत, गणेश मंदिरासमोर सायली हिल, बारामती सहकारी बँके शेजारी सम्‍यक, ज्येष्ठ नागरीकसंघ कार्यालय कॅनॉल, शेजारी वीर गोगादेव मंदिराजवळ, रिंगरोड कॅनॉल पुलाजवळ, मोरगाव रोड ढवाण शाळा जुने ठिकाण खरेदी विक्री पेट्रोल पंपाशेजारी खंडोबानगर मुख्‍यचौक, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा शारदानगर, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा सातववस्‍ती बालकल्‍याण केंद्र प्राथमिक शाळा मुक्‍ती टाऊनशिप फेज २, बानप शाळा क्र. २ कसबा, धो. आ. सातव शाळा जगताप मळा, मूकबधिर शाळा कारभारी नगर कसबा, शाहु हायस्कूल पाटस रोड, क्षेत्रीय नगर समाज मंदिर टकार कॉलनी ख्रिश्‍चन कॉलनी कॅनॉल लगत, तीन हत्‍ती चौक, तुपे बंगला समोर, कै. वस्‍ताद बाजीराव काळे स्‍वागत कमान, अशोक नगर पंचायत समिती समोर भारत बेकरी, हरिकृपा नगर बोबडे हॉस्‍पिटल शेजारी, परकाळे बंगला, दशक्रिया विधी घाट कसबा, माता रमाई भवन, सावित्रीबाई फुले समाजमंदिर, फलटण रोड राजगड हाईटस् गाळा नं. ६ हॉटेल निलम पॅलेस, गावडे हॉस्पिटल शेजारी देवळे इस्‍टेट मंगल कार्यालय, काशीविश्वेश्‍वर मंदिरा शेजारी.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10960 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..